जळगाव जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे 16 फेब्रुवारीला आयोजन
Jalgaon District Level Women’s Democracy Day organized on February 16 जळगव (13 फेब्रुवारी 2026) : जळगाव जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन येत्या 16 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात सकाळी 11 वाजता होत आहे. याबाबची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी यांनी दिली आहे.
दर महिन्याच्या तिसर्या सोमवारी लोकशाही दिन
समस्याग्रस्त व पीडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी. यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हा स्तरावर दर महिन्याच्या तिसर्या सोमवारी राबविण्यात येतो.







