!-- afp header code starts here -->

यावलला सीसीटीव्हीच्या निगरात बारावी परीक्षेला सुरूवात


यावल (14 फेब्रुवारी 2026) : इयत्ता 12 वीची परीक्षा थेट सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या सुक्ष्म निरिक्षणात होत आहे.पहील्याच इंग्रजी विषयाच्या पेपरला सर्वचं परिक्षा केंद्रावर केंद्र प्रमुखांनी पेपर दरम्यान दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन केले यात कुणालाचं परिक्षा केंद्रात प्रवेश दिला नाही व वर्गात कॉपी करणे सीसीटीव्ही कॅमेर्‍यामुळे शक्य झाले नाही, परिणामी एका केंद्रावरील मुख्यध्यापकास विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी तुमच्या जवळच्या व्यक्तींना कॉपी करू दिली इतरांना मनाई केली असा आरोप केला व तो व्हीडीओ व्हायरल झाला. तेव्हा याची चौकशी गुरूवारी करण्यात आली असुन त्यात प्रथमदर्शनी तथ्थ आढळले नाही उलट व्हायरल व्हीडीओ मुळे शहरातील परिक्षा केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त व एक अतिरिक्त पथक एका केंद्रावर नेमण्यात आले होते.

सर्वच केंद्रावर सीसीटीव्हीची नजर
शहर व तालुक्यात मंगळवारपासुन इयत्ता 12 वीच्या परिक्षेला सुरवात झाली. यात सर्वचं परिक्षा केंद्रांवर मुख्य आवार सह वर्ग खोेल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. दरम्यान अचानक झालेली सक्ती मुळे व परिक्षा केंद्रात कुणालाचं प्रवेश न दिल्यामुळे काही आरोप पत्यारोप पालकांकडून होवु लागले यात मंगळवारी नगरपरिषद संचलीत साने गुरूजी विद्यालयातील मुख्यध्यापक एम.के.पाटील यांना काही विद्यार्थी व पालकांनी घराव घालुन तुम्ही काही वर्गात कॉपी करू दिली मात्र, दुसर्‍या वर्गात कॉपी करू दिली नाही असा आरोप केला. दरम्यान पेपर हा सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या निगराणीत झाल्याने त्यांनी आरोप फेटाळले. मात्र, हा व्हीडीओ समाज माध्यमात व्हायरल झाला. तेव्हा याची दखल जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी घेतली व गुरूवारी एका चौकशी समितीला येथे चौकशीचे आदेश दिले. गुरूवारी चौकशी पुर्ण झाली मात्र त्यात प्रथमदर्शनी तथ्थ आढळले नाही. या व्हायरल व्हिडिओमुळे शहरातील साने गुरूजी विद्यालयाच्या परिक्षा केंद्रावर अधिक सुक्ष्म पध्दतीने सीसीटीव्ही कॅमेर्‍यातुन बारीक लक्ष ठेवले जात आहे व एक अतिरिक्त पथक येथे पाहणीसाठी देण्यात आले आहे.


तीन तासांचे रेकॉर्ड तपासले
साने गुरूजी माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रात गुरूवारी गोपनिय रित्या एक पथक चौकशी करीता दाखल झाले होते व त्या पथकाने व्हायरल व्हीडीओत केलेल्या आरोपांसंबधी वर्ग खोल्यातील पुर्ण पेपर होई पर्यंतचे व्हीडीओ चित्रण तपासले आहे व या बाबतचा गोपनिय अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सोपवण्यात येणार आहे.

प्रत्येक हालचालीवर नजर
शहरात व्हायरल व्हिडीओमुळे साने गुरूजी विद्यालय व इंदिरा गांधी हायस्कुल या दोन्ही ठिकाणच्या परिक्षा केंद्रावर दोन्ही ठिकाणी प्रत्येक वर्गात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यातुन प्रत्येक हालचालवर सुक्ष्म नजर ठेवली जात आहे केंद्रात व सभोवताली चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !