‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी तरुण- तरुणीचा कारमध्ये मृतदेह आढळला
Bodies of young couple found in car on Valentine’s Day नोएडा (14 फेब्रुवारी 2026) : गेल्या 15 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या तरुण-तरुणींमध्ये लग्न करण्याच्या कारणावरून वाद सुरू असताना दोघांचा कारमध्ये मृतदेह आढळल्यासची घटना समोर आल्याने खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, रेखा असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव असून ती नोएडा सेक्टर-58 परिसरातील रहिवासी होती. सुमित असे मृत मुलाचं नाव असून तो दिल्लीतील त्रिलोकपुरीचा रहिवासी होता. हे दोघेही दीर्घकाळापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि रिलेशनशिपमध्ये होते.

पोलीस तपासात असं समोर आलं आहे की, दोघेही एक दिवसापूर्वीच आपापल्या घरातून बेपत्ता झाले होते. दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदवली होती. नोएडामध्ये एका कारमण्ये दोघांचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळी तरुणाच्या हातात पिस्तूल सापडलं असून त्याने आधी तरुणीवर गोळी झाडली आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
तपासादरम्यान असंही समोर आले आहे की, तरुणाने तरुणीला एक मेसेज पाठवला होता. त्या मेसेजमध्ये त्याने लिहिलं होतं की, ते दोघे गेल्या 15 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. तरुणाचा असा दावा होता की, तरुणीने त्याच्याशी लग्न करण्याचं वचन दिलं होते मात्र आता ती दुसर्या कोणाशी तरी लग्न करणार होती. पोलीस आता या अँगलनेही प्रकरणाचा तपास करत आहेत.
सध्या पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. पोलीस अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, प्रकरणाच्या प्रत्येक बाजूने तपास केला जात आहे. ही घटना संपूर्ण नोएडामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.






