!-- afp header code starts here -->

भुसावळातील ताप्ती पब्लिकच्या अनन्या जैनचे कराटे स्पर्धेत यश


भुसावळ (15 फेब्रुवारी 2026) : जेकेए इंडियातर्फे दहावी वरिष्ठ आणि कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कराटे स्पर्धा आसाम, गुवाहाटीत झाली. या स्पर्धेत भुसावळ येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यात अनन्या प्रशांत जैन हिने प्रमाणपत्र तसेच चॅम्पियनशिप मध्ये काता या प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

या शिवाय कुमिते या प्रकारात सिल्वर पदक दुहेरी यश संपादन केले.हे यश तीने वयाच्या बाराव्या वर्षी प्राप्त केले. या बद्दल तिचे स्कुलच्या प्रिंसीपल निना कटलर यांनी प्रमाणपत्र देऊन शाळेतर्फे सन्मानित केले.अनन्याने सातत्य व कठोर परिश्रमातून हे यश संपादन केल्याचे निना कटलर यांनी सांगितले. सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्हाईस प्रिंसीपल श्रद्धाली घुले, मनप्रीत कौर अरोड़ा यांच्यासह शिक्षक व इतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !