हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र : निरूपणकार डॉ. नितु पाटील
वासुदेव जेष्ठ नागरिक संघात निरूपण कथन
भुसावळ (15 फेब्रुवारी 2026) : श्री समर्थ रामदास स्वामी रचित मारुती स्तोत्र हे भगवान हनुमानाला समर्पित एक शक्तिशाली स्तोत्र आहे. हे स्तोत्र हनुमानाच्या सामर्थ्य, भक्ती आणि वीरतेचे प्रतीक आहे. संपूर्ण हनुमान चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र होय,असे कथन निरूपणकार डॉ. नितु पाटील यांनी केले.
ओम सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान संचलित वासुदेव जेष्ठ नागरिक संघाची मासिक सभा रिंग रोड, भुसावळ या ठिकाणी झाली. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव सतीश जंगले, निरूपणकार डॉ.नितु पाटील, संजय चौधरी, भानुदास पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विश्व प्रार्थना आणि हनुमान चालीसा पठणाने झाली.

मारुती स्तोत्र यावर निरुपणकार डॉ. नितु पाटील बोलत होते. पुढे ते म्हणाले की, मारुती स्तोत्राचे नियमित पठण केल्याने मानसिक शांति, भय आणि नकारात्मकता दूर होणे, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभणे, आणि जीवनात यश आणि समृद्धी प्राप्त होणे असे अनेक लाभ होतात.संपूर्ण 15 मारुती स्तोत्र श्लोक वर डॉ. पाटील यांनी प्रत्येक कथा, संदर्भ आणि त्यातून येणारा बोध अशी सविस्तरपणे माहिती सर्व जेष्ठ नागरिकांना दिली तसेच सर्व शंका निरसन केले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमात रमेश चौधरी, पुंजो भारंबे, हेमंत बोंडे, प्रभाकर झांबरे, भरत जंगले, लता चौधरी, जनार्दन राणे, दिलीपसिंग चौधरी, सुरेश बेलसरे, पुंजो भारंबे, रमण भोगे, प्रमोद बोरोले, विजया भारंबे, ज्योती चौधरी, राजाराम चौधरी, मोतीराम चौधरी, चंद्रकांत चौधरी, दिलीप चौधरी, प्रमिला चौधरी, प्रतिभा चौधरी, सोपान चर्हाटे, लोटू फिरके, अलका इंगळे, तुकाराम पाटील, सोपान नेमाडे, अशोक नेहेते, विजया पाटील, वैशाली तुकाराम पाटील, ज्ञानदेव पाटील, अनिल पाटील, सुलोचना पाटील, प्रकाश पंडित पाटील, ज्ञानेश्वर पाटील, इंदू पाटील, विकास राणे, गणेश सरोदे, इंदुबाई सपकाळे, रजनी तळेले, यशवंत वारके, विश्वनाथ वाणी, छबुताई झांबरे, पाटील, अरुण धांडे आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन सतीश जंगले यांनी केले. यशस्वीसाठी प्रकाश पाटील, संजय चौधरी, प्रभाकर झांबरे, अशोक नेहेते, धनराज पाटील, भास्कर खाचणे, भानुदास पाटील, सुनील सूर्यवंशी यांनी सहकार्य केले. विश्व कल्याण साधनारी प्रार्थना होऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. सूत्रसंचालन सतीश जंगले तर आभार प्रकाश पाटील यांनी मानले.







