भुसावळात भाजपाचे आंदोलन : हर्षवर्धन सपकाळांच्या प्रतिमेला मारले जोडे
BJP protest in Bhusawal: Couple attacks Harshvardhan Sapkal’s statue भुसावळ (15 फेब्रुवारी 2026) : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना केल्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा भुसावळात भाजपेयींनी तीव्र शब्दात निषेध केला. जामनेर रोडवरील अष्टभुजा देवी मंदिराजवळ रविवारी सकाळी भाजपाने आंदोलन करीत सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारत प्रतिमा जाळून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
त्या वक्तव्याबद्दल माफी मागावी
या आंदोलनात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सपकाळ यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले. यावेळी सपकाळ यांची प्रतिमा जाळून तीव्र संताप व्यक्त करीत त्यांनी त्या वक्तव्याबद्दल माफी मागावी आणि इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांबाबत अवमानास्पद विधाने करणे थांबवावे, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनादरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. .

यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपा गटनेते युवराज लोणारी, उपनगराध्यक्षा शैलेजा नारखेडे, शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, किरण कोलते, मनोज बियाणी, सरचिटणीस पवन बुंदेले, अमोल महाजन, सागर चौधरी यांच्यासह जिल्हा चिटणीस प्रवीण इखणकर, पुरुषोत्तम नारखेडे, अॅड.बोधराज चौधरी, देवेंद्र वाणी, नितीन धांडे, अनिता आंबेकर, शैलेजा पाटील, सोनल महाजन, वंदना सोनार, बापू महाजन, राजेंद्र आवटे, सुजित भोळे, आशिष पटेल, कैलास पाटील, अल्बर्ट तायडे, अनिरुद्ध कुलकर्णी, मुकेश मोरे, संकल्प वाणी, ऋषभ सिंह राजपूत, योगेंद्र हरणे, गोपी राजपूत, संजय बोचरे, विलास अवचार, कैलास शेलोडे, हेमंत सावकारे,सोनू अग्रवाल, सागर साळी तसेच पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, आघाडी-मोर्चा पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.







