!-- afp header code starts here -->

दहिगावच्या श्री महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त पाच क्विंटल फराळ वाटप


यावल (15 फेब्रुवारी 2026) : यावल तालुक्यातील दहिगाव येथील श्री महादेव हनुमान मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने सालाबादप्रमाणे महापूजा व पाच क्विंटल साबुदाणा फराळ, केळी, साखर वाटप करण्यात आली.

दिवसभर भाविकांची गर्दी
महादेवाची महापूजा मुरलीधर अंकुश पाटील व पत्नीसह चार विवाहित महिलांनी केली. पूजारी गिरी गोसावी होते. महाशिवरात्री निमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून गावातील व्यापारी जगदीश वासुदेव पाटील व जगदीश गायकवाड हे फराळ वाटपासाठी व खर्चातून दान करीत असतात. दिवसभर मंदिर व परिसरात भावगीत आणि रात्री आध्यात्मिकावर कार्यक्रम आयोजित होता.

यासाठी मंदिर ट्रस्टचे बाळकृष्ण पाटील उपसरपंच देविदास पाटील प्रमोद चौधरी हेमा न्हावी , रमेश टेलर, शैलेंद्र पाटील अरुण अत्तरदे यांचे मार्गदर्शनाखाली विजय लोहार. प्रभाकर राऊत. रवींद्र पाटील. भिका पाटील. गोकुळ पाटील. बाळू पाटील. पिंटू पाटील. बाळू धनगर. भैय्या तेली . देवाजी पाटील. किरण पवार. सागर आनंदा पाटील तसेच कांदा व्यापारी किशोर वासुदेव पाटील यांच्या सर्व कामगारांनी परिश्रम घेतले भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेऊन प्रसादाचा लाभही घेतला. घेतले व गावकर्‍यांनी उत्साहात कार्यक्रम पार पाडला.

किशोर वासुदेव पाटील यांची गड कांदे कामगार संघटना यांनी अनमोल सहकार्य केले.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !