भुसावळातील म्युन्सीपल हायस्कूलमध्ये दहावी परीक्षेसाठी 436 विद्यार्थी प्रविष्ठ
भुसावळ (18 फेब्रुवारी 2026) : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. केंद्र क्रमांक 3205 ‘भुसावळ ब’अंतर्गत परीक्षा व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. मुख्य केंद्र म्हणून म्युनिसिपल हायस्कूलमध्ये परीक्षा होणार आहे. येथे 436 परीक्षार्थीची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
परीक्षेसाठी प्रशासन सज्ज
मुख्य केंद्रावर मराठी माध्यमाचे सर्व विषय तसेच तांत्रिक व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. बैठक क्रमांक डी 164258 ते डी 164482 व डी 164663 ते डी 164695 या क्रमांकांतील एकूण 256 विद्यार्थ्यांसाठी 10 स्वतंत्र कक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक्स, हिंदी व संस्कृत विषयांची परीक्षा मुख्य केंद्रावरच होणार आहे. उपकेंद्र म्हणून अहिल्यादेवी कन्या विद्यालय येथे सेमीइंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. बैठक क्रमांक डी 164483 ते डी 164662 या क्रमांकांतील एकूण 180 विद्यार्थी 8 कक्षांमध्ये परीक्षा देणार आहेत. या उपकेंद्रावर सेमीइंग्रजी माध्यमातील बीजगणित, भूमिती तसेच विज्ञान पेपर 1 व 2 या विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. सर्व विषयांनुसार बैठक क्रमांक व वेळापत्रकाची माहिती मुख्य केंद्र म्युनिसिपल हायस्कूल व उपकेंद्र अहिल्यादेवी कन्या विद्यालय येथे सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी पिण्याच्या पाण्याची बाटली घरून भरून आणावी.तसेच विभागीय मंडळाच्या वेळापत्रकानुसार प्रवेशपत्रासह परीक्षेच्या वेळेपूर्वी किमान 40 मिनिटे आधी केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन केंद्र संचालक संजीव पाटील यांनी केले आहे.








