!-- afp header code starts here -->

बडनेरा-नाशिक, साईनगर शिर्डी-बिकानेर विशेष रेल्वेचा कालावधी वाढवला


Duration of Badnera-Nashik, Sainagar Shirdi-Bikaner special trains extended भुसावळ (19 फेब्रुवारी 2026) : बडनेरा-नाशिक रोड अनारक्षित तसेच साईनगर शिर्डी-बिकानेर साप्ताहिक विशेष रेल्वेच्या संचालन कालावधीत वाढ करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

असा वाढला कालावधी
बडनेरा-नाशिक रोड अनारक्षित विशेष गाडी 01211 ही पूर्वी 28 फेब्रवारीपर्यंत धावणार होती. आता तिचा कालावधी वाढवून 15 जुलैपर्यंत करण्यात आला तसेच नाशिक रोड-बडनेरा अनारक्षित विशेष गाडी 01211 हिचाही संचालन कालावधी 15 जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. याशिवाय साईनगर शिर्डी-बिकानेर साप्ताहिक विशेष गाडी 04716 ही पूर्वी 1 मार्चपर्यंत अधिसूचित होती. आता ती 29 मार्चपर्यंत धावणार आहे. बिकानेर-साईनगर शिर्डी विशेष गाडी 04715 ही पूर्वी 28 फेब्रुवारीपर्यंत होती. तिचा कालावधी वाढवून 28 मार्चपर्यंत करण्यात आला आहे. विशेष गाडी 04716 साठी आरक्षण 16 फेब्रुवारीपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच ऑनलाईनच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !