भुसावळातील भोळे महाविद्यालयात उद्या महिला आरोग्य अभियान
भुसावळ (20 फेब्रुवारी 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात शनिवार, 21 फेब्रुवारी रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग माध्यमातून महिला आरोग्य संवर्धन ऋतीमती अभियान अंतर्गत विद्यार्थिनींच्या विविध समस्या या विषयी जागृतीबाबत व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
प्रमुख वक्ते म्हणून स्त्रीरोग तज्ञ डॉ. माया आर्वीकर (डॉ.उल्हास पाटील मेडीकल कॉलेज जळगाव) असतील. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.राजू फालक असतील. विद्यार्थ्यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन समन्वयक प्रा.डॉ.अंजली पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी केले आहे.








