पाडळसेत 10 मार्चपासून पं.प्रदीप मिश्रांची शिवमहापुराण कथा : तीन लाखांवर भाविक येणार !


Pandit Pradeep Mishra’s Shiv Mahapuran story from March 10 in Padalset: Over three lakh devotees will come! भुसावळ (21 फेब्रुवारी 2026) : पंडित प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांच्या सुश्राव्य वाणीतून यावल तालुक्यातील पाडळसे, ता.यावल येथे ‘शिवमहापुराण’ कथेचे आयोजन करण्यात आले आहे. 10 ते 16 दरम्यान होणार्‍या कथा सोहळ्यासाठी प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. या कथेसाठी राज्यभरातून तीन लाखांवर भाविक येण्याचा अंदाज आहे.

या अधिकार्‍यांची उपस्थिती
10 ते 16 मार्च दरम्यान होणार्‍या या सोहळ्याच्या नियोजनासाठी अप्पर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. भाविकांची सुरक्षा, वाहतूक कोंडी आणि मूलभूत सुविधांबाबत चर्चा झाली. प्रांताधिकारी कार्यालयातील तापी सभागृहात शुक्रवारी दुपारी 12 वाजता बैठक झाली. बैठकीत प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, फैजपूर विभागाचे प्रांत बबनराव काकडे, यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, गटविकास अधिकारी मनिषा गायकवाड, फैजपूर मुख्याधिकारी गांगोडे, रेल्वे सुरक्षा बलाचे उपायुक्त अशोककुमार, बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ, शहर निरीक्षक उध्दव डमाळे, फैजपूर येथील सहायक निरीक्षक रामेश्वर मोताळे, वाहतूक शाखेचे उमेश महाले यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, आरोग्य विभाग, तहसीलदार, सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन, पालिका अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन केंद्राचे अधिकारी,कर्मचारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, शिवमहापुराण कथा आयोजन समितीचे अध्यक्ष व समिती सदस्य अश्या 19 विभागाच्या अधिकार्‍यांना या बैठकीत बोलाविले होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंग रावळ यांनी सूत्रसंचालन केले. अपर जिल्हाधिकारी हारकर यांनी सर्व कामाचा आढावा घेतला.

9 रोजी कलशयात्रा : 10 पासून कथेला सुरुवात
सोमवार, 9 मार्चला सकाळी तापी नदीच्या उत्तर भागापासून कथा स्थळापर्यंत भव्य कलश यात्रा निघेल तर दुपारी चार वाजता पंडित प्रदीप मिश्रांचे रस्ते मार्गाने भुसावळात आगमन होईल. त्यांचे निवासस्थान तापी नगरातील के.नारखेडे शाळेसमोर (रतन भोई यांचे घर) असेल. 10 ते 15 मार्च दररोज दुपारी एक वाजता निवासाहून प्रस्थान व दुपारी एक ते चार या वेळेत कथा श्रवण. सोमवार, 16 मार्च रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत कथेचे पुष्प गुंफले जाईल आणि दुपारी तीन वाजता महाराज सिहोरकडे रवाना होतील.

वाहतूक नियोजनासह बसेस व रेल्वे सुविधा
सार्वजनिक बांधकाम विभागाने तापी पुलावर दोन्ही बाजूने सुरक्षा जाळी बसवणे, तात्पुरता दुभाजक टाकणे आणि जळगाव रस्ता ते तापी पुलापर्यंतच्या रस्त्याची तातडीने डागडुजी करणे, पोलिस व आरटीओ, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकार्‍यांनी यावल, सावदा, फैजपूरकडे जाणारी अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याबाबत सूचना करण्यात आली.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !