भुसावळातील भोळे महाविद्यालयात महिला आरोग्य संवर्धन ऋतीमती अभियान अंतर्गत व्याख्यान


भुसावळ (21 फेब्रुवारी 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात शनिवार, 21 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता कवयित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आरोग्य संवर्धन ऋतीमती अभियान अंतर्गत महिलांचे विविध आजार व उपाययोजना या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

मासिक पाळीबद्दल मार्गदर्शन
डॉ.माया अर्वीकर यांनी महिला आरोग्य व संवर्धन अंतर्गत विविध आजार व उपाययोजना या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी मुलींना मासिक पाळी संदर्भातील विविध शारीरिक व मानसिक समस्यांची माहिती दिली. मासिक पाळीदरम्यान स्वच्छता, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत त्यांनी पॉवरपॉइंट सादरीकरणाद्वारे स्पष्ट केले. विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.

यांची विचार मंचावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. वक्त्यात डॉ.माया अर्वीकर, कार्यशाळा समन्वयक प्रा.डॉ.अंजली पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजय चौधरी विचारमंचावर उपस्थित होते

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकात डॉ. अंजली पाटील यांनी महिला आरोग्याचे महत्त्व, विशेषतः किशोरवयीन मुलींच्या आरोग्य समस्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज यावर प्रकाश टाकला.

तर समाजही असेल निरोगी : प्राचार्य
प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी आपल्या भाषणात दैनंदिन जीवनात महिला आरोग्याचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, स्त्रीचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य सुदृढ असेल तर कुटुंब आणि समाजही निरोगी राहतो. संतुलित आहार, व्यायाम आणि सकारात्मक विचार यांना त्यांनी विशेष महत्त्व दिले. तसेच महिलांनी स्वतःच्या आरोग्याची नियमित काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांन अधोरेखित केले व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिले.

सूत्रसंचालन डॉ.माधुरी पाटील तर आभार प्रदर्शन प्रा.संगीता धर्माधिकारी यांनी मानले.

कार्यशाळेसाठी प्रा.श्रेया चौधरी, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.सुशीला बाटे, प्रा.गायत्री नेमाडे, प्रा.अश्विनी भाग्यवंत, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.आर.डी.भोळे, सुधाकर चौधरी, सुनील ठोसर, दीपक महाजन, प्रकाश सावळे विजय पाटील, किरण पाटील, प्रमोद नारखेडे आदींनी परिश्रम घेतले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !