भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात लॉर्ड बेडन पॉवेल जयंती उत्साहात


Lord Baden Powell’s birth anniversary celebrated with enthusiasm at K. Narkhede School in Bhusawal भुसावळ (23 फेब्रुवारी 2026) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात शनिवारी दुपारी चार वाजता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता अडकमोल यांच्या अध्यक्षतेखाली 22 फेब्रुवारी रोजी असलेला ‘चिंतन दिवस’ साजरा करण्यात आाल. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक एस.पी. पाठक, ज्येष्ठ विज्ञान शिक्षक बी.बी.जोगी उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती
लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पणाने झाली. त्यानंतर स्काऊट गाईड प्रार्थना घेण्यात आली. त्यानंतर जान्हवी पाटील, मयुरी कोळी रुपल नेहेते यांनी प्रतिज्ञा, स्काऊट गाईड चळवळीचा इतिहास आणि लॉर्ड बेडन पॉवेल यांच्याबद्दल माहिती दिली. गाठीचे प्रकार व उपयोगाबद्दल पायल खंडारे हिने तर स्काऊट गाईड विषय घेण्याचा दैनंदिन जीवनात काय उपयोग होतो या संदर्भात वरद पाटील याने आपले विचार मांडले.

स्काऊट गाईडचे नियम हे जितेश पाटील, आदित्य कोळी, चेतन बर्‍हाटे, केदार पाटील यांनी सांगितले. बेडन पॉवेल गीत समीक्षा पाटील, कोमल पाटील, लक्ष्मी तायडे यांनी सादर केले. तबल्याची साथ केदार पाटील या विद्यार्थ्याने दिली. सूत्रसंचालन गाईड दिव्या धनगर व दिव्या महाजन यांनी केले.

पर्यवेक्षक एस.पी.पाठक यांनी विद्यार्थ्यांना याप्रसंगी बहुमोल मार्गदर्शन केले. आभार अनन्या सपकाळे या गाईडने मानले. कार्यक्रमास संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी स्काऊट मास्टर शैलेश महाजन, गाईड कॅप्टन कांचन राणे, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, नेहा पाटील, स्वाती ईखे, शुभांगी पाटील व स्मिता झांबरे तसेच संपूर्ण स्काऊट गाईड युनिट व विद्यालयाचे विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !