आगामी निवडणुकांच्या रणनितीबाबत रिपब्लिकन सेनेची भुसावळात उद्या बैठक
भुसावळ (23 फेब्रुवारी 2026) : रिपब्लिकन सेनेच्या संघटन मजबुतीसाठी आणि आगामी राजकीय आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी मंगळवार, 24 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता अष्टभुजा मंदिर समोर, भुसावळ येथे एका विशेष जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही बैठक रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या बैठकीत प्रामुख्याने आगामी काळात होणार्या निवडणुकांचे नियोजन, तालुका कार्यकारिणी आणि शहर कार्यकारिणीची पुनर्रचना यावर सविस्तर खल केला जाणार आहे.
बैठकीला प्रमुख मार्गदर्शक रिपब्लिकन कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष, प्रमोद इंगळे, जिल्हा नेते दिनेश इखारे, महिला सेना जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे उपस्थित राहतील.


बैठकीमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच, संघटनेची ताकद वाढवण्यासाठी तालुका आणि शहर स्तरावरील नवीन निवडींबाबत निर्णय घेण्यात येतील.
या बैठकीला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष मेजर देवदत्त मकासरे
मेजर, जिल्हा महासचिव वंदना आराक, जिल्हा संघटक प्रमोद बावस्कर आदींनी केले आहे.