जवाहर नवोदय विद्यालयामार्फत भानखेडे शाळेत साहित्य वाटप
भुसावळ (23 फेब्रुवारी 2026) : भुसावळ तालुक्यातील भानखेडे येथील शाळेत पी.एम.श्री शाळा जवाहर नवोदय विद्यालयामार्फत जोगलखेडे व भानखेडे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
नाटीकेने केले अंतर्मुख
प्राचार्य आर.आर. खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली कम्युनिटी मोबिलायझेशन उपक्रमांतर्गत भुसावळ येथील पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालय येथील विद्यार्थिनी भक्ती काळभीरे, अनुष्का पाटील, अश्विनी कोळी, कार्तिकी पाटील, ओजस्वी पाटील, हर्षदा सोनवणे व यशश्री पवार यांनी जीवनातील शिक्षणाचे महत्त्व या विषयावर नाटिका सादर केली.



जोगलखेडे व भानखेडे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी नवोदय विद्यालयाचे शिक्षक स्वप्नील वाघ यांनी प्रास्ताविक तर भानखेडे शाळेचे मुख्याध्यापक गणेश फेगडे यांनी मनोगतात शिक्षणाचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमास नवोदय विद्यालयाच्या शिक्षिका प्रतिमा प्रजापती तसेच जोगलखेडे व भानखेडे शाळेचे उपशिक्षक सुधीर तायडे, शिक्षिका सोनाली तायडे तसेच दोन्ही शाळांचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.