भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात
भुसावळ (23 फेब्रुवारी 2026) : शहरातील श्रीमती प.क. कोटेचा महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, इतिहास विभाग आणि समारंभ समितीतर्फे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यापर्ण करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.जीवन धांडे होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील घटना आणि आजची परिस्थिती यांचे समायोजन करून अनेक उदाहरणे दिली.


रक्षंदा जैन, कल्याणी शेलोडे, हर्षदा जाधव, जयश्री सोनवणे, कविता बारेला या विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल पूर्ण सभागृहाला माहिती दिली. यात कविता वाचन व पाळण्याचा समावेश होता. कार्यक्रमात रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.मीना चौधरी, इतिहास विभाग प्रमुख प्रा.दीपाली पाटील, प्रा.एस.बी.नेतनराव, रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी व इतर प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन हर्षदा लोहारने केले.