मसाला व्यापार्याची आठ लाखांची रोकड लुटली : रावेरातील टोळी गजाआड
Spice trader robbed of cash worth eight lakhs: Gang from Ravera on the run रावेर (25 फेब्रुवारी 2026) : मसाला व्यापार्याकडील कर्मचार्याला अडवत त्याच्याकडील आठ लाखांची रोकड लुटणार्या रावेरातील टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सात आरोपींकडून गुन्ह्यातील वापरलेल्या वाहनासह रोकड मिळून तीन लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
असे आहे लूट प्रकरण
बर्हाणपूरचे मसाला व्यापारी दीपक सुरेश धर्माणी यांचे कर्मचारी गौरव वाघ आणि तौफिक तेली हे शुक्रवार, 6 फेब्रुवारी 2026 रोजी सावदा, फैजपूर आणि रावेर परिसरातून वसुली करून परतत असताना याची दिवशी रात्री 9 वाजेच्या सुमारास खानापूर आरटीओ बॅरेकजवळ 8 ते 9 अज्ञात इसमांनी त्यांची दुचाकी अडवून पैशांची बॅग हिसकावली होती. रावेर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर सीसीटीव्ही तसेच तांत्रिक तपासाद्वारे आरोपींचा शोध सुरू होता. रावेर, सावदा आणि फैजपूर परिसरातील तब्बल 67 सीसीटीव्ही फुटेज तसेच खबर्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रावेरातील संशयीत निष्पन्न करीत त्यांना बेड्या ठोकल्या.

या आरोपींना अटक
अटकेतील संशयीतांमध्ये फारुख शेख रईस (19), अत्ताउल्लाह खान दाउद खान ऊर्फ सोनू, शेख सईद शेख कादर ऊर्फ सुपडू, शेख समीर शेख कलीम ऊर्फ विकू, राहील खान दाउद खान, रहेमान खान अय्युब खान ऊर्फ भुन्र्या, अक्रम खान इस्माईल खान (सर्व रा.बंडू चौक, रावेर) यांचा समावेश आहे. या गुन्ह्यातील मुख्य संशयीत व सराईत गुन्हेगार शेख हसन शेख अफजल ऊर्फ हसन फावड्या (रा.रुस्तम चौक) हा पोलिसांचा सुगावा लागताचप पसार झाला. आरोपींकडून 95 हजार रुपये किमतीच्या दोन मोटार सायकली आणि दोन लाख 55 हजारांची रोकड जप्त करण्यात आली तर आरोपींना 26 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक तुषार पाटील, हवालदार सुनील वंजारी, कल्पेश आमोदकर, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, विकारोद्दीन शेख, अतुल गाडीलोहार, गजानन बोने व सहकार्यांनी केली.