यावल शहरातील स्मशानभूमी व न्यायालयात संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान
यावल (25 फेब्रुवारी 2026) : यावल शहरातील समस्त परिट समाज बांधवांनी एकत्र येत सोमवार, 23 फेब्रुवारी रोजी श्री संत गाडगे महाराज यांच्या असलेल्या 150 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता अभियान राबवले. शहरातील सार्वजनिक स्मशानभूमी परिसरात तसेच यावल न्यायालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. हा संपूर्ण परिसर त्यांनी स्वच्छ केला.
स्वच्छता मोहिमेने समाधान
शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या सार्वजनिक स्मशानभूमीत रविवारी अशोक सुरळकर, संतोष वाघ, गणेश खर्चे, शरद वाघ, अजय बाविस्कर, विक्की बाविस्कर सह समस्त परिट समाज बांधवांनी एकत्र येत स्वच्छता अभियान राबवले. सोमवारी श्री संत गाडगे महाराज यांची 150 वी जयंती आहे. या जयंतीच्या पार्श्वभूमीवर समस्त परीट समाज बांधव एकत्र आले.

पहिल्या दिवशी सर्वत्र स्वच्छता अभियान व दुसर्या दिवशी सोमवारी प्रतिमा पूजन व विविध कार्यक्रम शहरात साजरे करण्यात आले. समस्त समाज बांधवांनी एकत्र येत स्मशानभूमीत स्वच्छता केली त्यानंतर यावल न्यायालयात जाऊन न्यायालयाचा आतील व बाहेरचा परिसर त्यांनी स्वच्छ केला या स्वच्छता अभियानामध्ये मयूर खर्चे, दुर्गेश खर्चे, नितीन वाघ, अशोक वाघ, छोटू बोरसे, मयूर सुरळकर सह मोठ्या संख्येत परीट समाताील अबाल,वृद्ध, तरुण सहभागी झाले होते.