किनगाव खुर्दला सात लाखांचा पुल निकृष्ट ! चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा


Kingaon Khurd bridge worth seven lakhs found to be substandard ! Threat of hunger strike if no inquiry is conducted यावल (25 फेब्रुवारी 2026) :  यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथे दफनभूमीजवळ जिल्हा परिषद निधीतून बांधण्यात आलेल्या छोट्या पुल व गटारीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी सरफराज पिंजारी यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करत चौकशीची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

काय आहेत आरोप ?
किनगाव खुर्द, ता.यावल येथील मुस्लिम समाजाच्या दफनभूमीकडे जाणार्‍या मार्गावर 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून सुमारे सात लाख रुपये खर्च करून सिडी वर्क आणि गटार बांधकाम करण्यात आले आहे मात्र या कामात शासनाच्या अटी-शर्ती आणि तांत्रिक निकषांचे पालन न करता ठेकेदार व संबंधित अभियंत्यांनी संगनमताने अत्यत निकृष्ठ दर्जाचे बांधकाम केल्याचा आरोप आहे. या संदर्भात सरफराज पिंजारी यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्याकडे सविस्तर तक्रार केली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !