भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची एक दिवसीय औद्योगिक भेट


One-day industrial visit of students of D.N.Bhole College, Bhusawal भुसावळ (26 फेब्रुवारी 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एक दिवसीय औद्योगिक भेट प्राचार्य डॉ.राजू फालक यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार, 26 रोजी आयोजित करण्यात आली. सर्वप्रथम एशियन लॅबला भेट दिली. एशियन लॅब चे संचालक कांचन चौधरी यांनी रिअ‍ॅक्शन, सेंट्रीफ्यूजबद्दल माहिती दिली.

अ‍ॅग्रो कंपनीला भेट
त्यानंतर खरे अ‍ॅग्रो कंपनीला भेट दिल्यानंतर इंडस्ट्रीचे संचालक वसंत खरे यांनी माहिती दिली. 9 प्रकारच्या बियापासून या कंपनीत तेल बनवले जाते. त्यामध्ये शेंगदाणा, बदाम, खोबर, करडई, मोहरी, सूर्यफूल, जवस, लाकडी घान्यापासून शुद्ध तेल कसे बनवले जाते याची माहिती यावेळी घेण्यात आली. इंडस्ट्रीयल भेटीसाठी विभागप्रमुख प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.डॉ.आर.बी ढाके, प्रा.कामिनी चौधरी, मिलिंद नेमाडे, दीपक महाजन यांनी परिश्रम घेतले. बीएस्सी एमएस्सीसहित 25 विद्यार्थी सहभागी होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !