दीपनगरातील 660 मेगावॅट केंद्रात क्लिन्कर कोसळला : वीज निर्मितीवर परिणाम


Clinker collapses at 660 MW plant in Deepnagar: Impact on power generation भुसावळ (27 फेब्रुवारी 2026) : दीपनगरातील 660 मेगावॅट वीज उत्पादन केंद्रात क्लिन्कर कोसळल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. बॉटम अ‍ॅश हॉपरमधील पाण्यात पडलेल्या 1200 सेंटिग्रेड तापमान असलेला क्लिन्कर कोसळल्याने वाफेच्या प्रेशरने पाणी, राख बाहेर फेकले गेले. सुदैवाने या परिसरात कर्मचारी नसल्याने जीवितहानी टळली. या घटनेमुळे दीपनगर केंद्रातून रोज सुरू असलेली विजेची निर्मिती उन्हाळ्याचे चटके वाढत असतानाच थांबली आहे.

राज्यावर वीज संकट !
दीपनगर प्रकल्पातील या घटनेमुळे राज्याला आता 660 मेगावॅट विजेचा तुटवडा पडणार आहे. तो भरून काढण्यासाठी महाराष्ट्राला इतर राज्य किंवा केंद्र सरकारकडे विजेची याचना करावी लागणार आहे.


क्लिन्कर कोसळला ; संच बंद
सूत्रांच्या माहितीनुसार, दीपनगरातील 660 वीज निर्मिती केंद्रात बुधवारी दुपारी बाष्पकात अडकलेला क्लिन्कर पडल्याने मोठा आवाज झाला त्यासोबतच पाणी बाहेर फेकले गेल्याने संच बंद करण्यात आला. क्लिन्कर पडल्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. संच क्रमांक चारमध्ये ही ट्युब लिकेज मुळे संच ठेवण्यात आला आहे तर दुसरीकडे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेला संच क्रमांक तीन सुरू करण्यात आल्याने विजेची तूट भरून काढण्याचा प्रयत्न आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !