विद्यार्थ्यांनी नवनवीन संशोधन करावे : भुसावळात डॉ.देवयानी बोरोले


Students should do new research: Dr. Devyani Borole in Bhusawal भुसावळ (28 फेब्रुवारी 2026) : शहरातील के.नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उपक्रमांतर्गत ‘नाविन्यता आनंद व प्रगती’ या उपक्रमांतर्गत गुरुवार, 26 रोजी कार्यक्रम झाला. यावेळी पोलर वूमन ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणार्‍या डॉ.देवयानी ज्ञानदेव बोरोले प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी नवनवीन संशोधन करावे, असे आवाहन त्यांनी मार्गदर्शनात केले. यावेळी त्यांचा परिचय व स्वागत विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक एस.एस.कापसे यांनी तर प्रास्ताविक नितीन पाटील यांनी केले.

पोलर वूमन
डॉ.देवयानी बोरोले या भारत सरकारतर्फे अंटार्टिका खंडातील रिसर्च लॅब येथे प्रमुख डॉक्टर सायंटिस्ट म्हणून कार्यरत होत्या. त्यांना पोलर वुमन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. डॉ.बोरोले यांना सांस्कृतिक विभागाचा हिरकणी पुरस्कार तसेच महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे जीवनगौरव पुरस्कार प्राप्त आहे.



डॉ.देवयानी बोरले यांनी पीपीटीद्वारे अंटार्टिका मोहिमेमधील त्यांचे कार्य व स्वतःचे अनुभव कथन करून विद्यार्थ्यांना अमूल्य असे मार्गदर्शन केले. वाढत्या जागतिक तापमानाचा अंटार्टिकावर होणारा परिणाम तसेच वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता विकसीत कशा प्रकारे करता येईल याविषयीचे संशोधन या ठिकाणी चालते, अशी माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

येणार्‍या नवीन पिढीचे आरोग्य चांगले कशा रीतीने टिकून ठेवता येईल यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकाधिक व नवनवीन संशोधन करावे, असे विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी सांगितले. आजच्या विद्यार्थ्याला विज्ञानाच्या क्षेत्रातील शास्त्रज्ञ म्हणून उपलब्ध असणार्‍या संधी विषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता अडकमोल होत्या.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास केएनसीटीआय प्रमुख बी.ए.पाटील, इतर सर्व संगणक शिक्षक-शिक्षकेतर स्टाफ, पर्यवेक्षक एस.पी.पाठक, ज्येष्ठ विज्ञान शिक्षक बी.बी.जोगी सर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विद्यालयाचे शिक्षक एन.जे.पाटील, एस.एस.कापसे, एन.एस.पाटील, प्रयोगशाळा सहाय्यक आसीफ तडवी, माधव बाविस्कर व सर्व विज्ञान व भूगोल शिक्षकांनी केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !