यावल तहसील, नगरपालिका व पंचायत समितीत दिव्यांग बांधवांचे विविध मागण्यांचे निवेदन
यावल (28 फेब्रुवारी 2026) : यावल तहसील कार्यालय तसेच पंचायत समिती व नगरपरिषदेत प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने शुक्रवारी निवेदन देण्यात आले. दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या संदर्भात वेळोवेळी निवेदन देऊनही मागण्या मान्य होत नसल्याने स्मरणपत्र देण्यात आले आहे व तातडीने मागण्या मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा दिव्यांग बांधवांनी दिला आहे.
या मागण्यांसाठी निवेदन
यावल तहसील कार्यालयात नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, नगरपरिषदेत नगराध्यक्षा छायाताई अतुल पाटील यांच्याकडे तसेच पंचायत समितीमध्ये प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे यावल तालुकाध्यक्ष हरी विजय पाटील यांनी निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की, दिव्यांगांचे विविध मागण्या संदर्भात निवेदन दिली मात्र अद्यापही कुठलीच कार्यवाही झाली नाही. म्हणून पुन्हा स्मरणपत्र देत आहोत. यावल तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना अंतोदय योजनेचा लाभ मिळावा, सातबारा शेतकर्यांचा कोरा करावा, शेतीमालाला हमीभाव द्यावा, दिव्यांग बांधवांना मिळणारे पंधराशे रुपये अनुदान हे अडीच हजार करावे, दिव्यांगांसाठी खासदार आमदार निधीतून पैसे खर्च व्हावे, दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा तसेच 5 टक्के चा निधी वितरण केला जावा यासह त्यांचे विविध मागण्या आहेत. तेव्हा मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.


यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी हरीभाऊ पाटीलसह प्रतीक पाटील, रामदास पाटील, ललित पाटील, मीना देशमुख, साहेबराव पाटील, सुरेश पाटील, चंद्रकांत पाटील, आशा कोळी, विमल मोरे, रमेश आमोदे, अतुल जैन, राजेन्द्र गीते, कमलाकर चौधरी, महेमूद तडवी, सागर पाटीलसह मोठ्या संख्येत दिव्यांग बांधव उपस्थित होते.