भुसावळातील रेल्वे इलेक्ट्रीक शेडमध्ये ‘होली के रंग महिलाओ के संग’ कार्यक्रम
भुसावळ (2 मार्च 2026) : शहरातील रेल्वेच्या इलेक्ट्रीक लोको शेडमध्ये ‘होली के रंग महिलाओ के संग’ कार्यक्रम उत्साहात झाला. प्रमुख पाहूणे म्हणून बियाणी एज्यूकेशन ुग्रुपच्या सचिव डॉ.संगीता बियाणी, इलेक्ट्रिक लोको शेडचे मुख्य अभियंता चाणक्य जैन व त्यांच्या पत्नी प्रियंका जैन उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ संगीता बियाणी यांनी रेल्वेतील महिला कर्मचार्यांना मार्गदर्शन केले.
कलागुणांचे सादरीकरण
प्रियंका जैन यांनी शेडमधील महिलांसाठी प्रथमच विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी रेल्वे कर्मचारी महिलांना मार्गदर्शन केले. प्रसंगी महिलांनी आपले कला गुण सादर केले. गुणवंत रेल्वे कर्मचारी महिलांना चाणक्य जैन व प्रियांका जैन यांच्याहस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले. शेडमधील महिलांनी होळी खेळून कार्यक्रम साजरा केला. सूत्रसंचालन मुन्सफ अली यांनी तर आभार ज्योती समुद्रे यांनी मानले. यशस्वीतेसाठी ओएस राजीव कुमार सिंग, ज्योती समुद्रे यांच्या सह शेड मधील रेल्वे कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.









