भुसावळातील भोळे महाविद्यालयात महिला आरोग्य व संवर्धन उपक्रमांतर्गत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर
Hemoglobin check-up camp under women’s health and welfare initiative at Bhole College, Bhusawal भुसावळ (2 फेब्रुवारी 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात महिला आरोग्य व संवर्धन उपक्रमांतर्गत महिला व यवतीची तसेच अध्यापन कर्मचार्यांची हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या ‘महिला आरोग्य, संवर्धन व ऋतीमती अभियान’ अंतर्गत आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी भुसावळ नगरपालिका प्रशासनाचे सहकार्य लाभले.
यांची होती उपस्थिती
वक्ते म्हणून नगरपालिका रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर होत्या. व्यासपीठावर विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजय चौधरी, महिला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.अंजली पाटील होत्या.


मोफत आयर्न गोळ्यांचे वितरण
डॉ.किर्ती फलटणकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थिनींना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. संतुलित आहार, नियमित आरोग्य तपासणी आणि योग्य जीवनशैली यांद्वारे महिलांचे आरोग्य कसे सुदृढ ठेवता येईल, याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. लोहअभाव टाळण्यासाठी आयर्न टॅब्लेट्सचे महत्त्व पटवून देत उपस्थित विद्यार्थिनी व अध्यापन कर्मचार्यांना मोफत आयर्न गोळ्यांचे वितरण करण्यात आले.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थिनी व शिक्षकवर्ग सहभागी झाले. आरोग्य तपासणीमुळे महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली. उपक्रमासाठी प्रा.श्रेया चौधरी, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.सुशीला बाटे, प्रा.गायत्री नेमाडे, प्रा.अश्विनी भाग्यवंत, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.डॉ.एस.डी.चौधरी, प्रा.अनिल सावळे, विजय पाटील, प्रकाश चौधरी, प्रकाश सावळे, सुधाकर चौधरी, सुनील ठोसर आदींनी परिश्रम घेतले.







