निधन वार्ता : ताराबाई ललवाणी
भुसावळ : शहरातील दत्त धाम, प्रोफेसर कॉलनी भागातील रहिवासी ताराबाई मदनलाल ललवाणी (80) यांचे वृद्धापकाळाने रविवारी मध्यरात्री निधन झाले. त्या श्री श्रावक संघाचे माजी कोषाध्यक्ष व धार्मिक सु श्रावक मदनलाल ललवाणी यांच्या धर्मपत्नी तर कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डी.एम.ललवाणी व व्यापारी नलीन ललवाणी यांच्या मातोश्री होत. यावल रस्त्यावरील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


