अमेरिका-इराण युद्धाचा परिणाम : शेअर बाजार कोसळला ; सोन्याच्या दरात पाच हजारांची वाढ
Impact of US-Iran war : Stock market crashes; Gold price rises by Rs 5,000 मुंबई (2 फेब्रुवारी 2026) : अमेरिका-इस्रायल-इराणमध्ये सुरू झाल्यो युद्धानंतर सोमवार, 2 मार्च रोजी भारतीय शेअर बाजार घसरल्याने गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये स्वाहः झाले. सेन्सेक्स 1048 अंकांनी (1.29%) घसरून 80,239 वर बंद झाला. निफ्टी देखील सुमारे 313 अंकांनी (1.24%) घसरून 24,866 वर पोहोचला.
कच्चे तेल 79 डॉलरवर पोहोचले
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आज ऊर्जा आणि ऑटो शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. ब्रेंट क्रूडच्या किमती 10 टक्के वाढून प्रति बॅरल 79 डॉलरवर पोहोचल्या. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, जर हा तणाव आणखी वाढला तर तेलाच्या किमती प्रति बॅरल 120 डॉलरवर पोहोचू शकतात.


याचा परिणाम भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर होऊ शकतो. दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर 95 रुपयांवरून 100 रुपयांपर्यंत वाढू शकते. डिझेल 88 रुपयांवरून 92 रुपयांपर्यंत वाढू शकते. इतर शहरांमध्येही अशाच प्रकारच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे.
सोन्याचा भाव वाढला
एमसीएक्स फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1.67 रुपयांवर आहे, जो पाच हजारांंनी (3%) वाढला आहे. चांदीचा भाव आठ हजारांनी (3%) वाढून 2.91 लाख रुपयांवर पोहोचला आहे. कमोडिटी तज्ज्ञ अजय केडिया यांच्या मते, अमेरिका-इराण युद्धामुळे सोने 1.90 लाख रुपयांपर्यंत आणि चांदी 3.5 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते.







