उत्पन्नाच्या योग्य नियोजनासह बचतीत सीएंचे योगदान महत्त्वाचे : भुसावळात मंत्री संजय सावकारे
CAs’ contribution in savings along with proper income planning is important: Minister Sanjay Savkare in Bhusawal भुसावळ (4 मार्च 2026) : उत्पन्नाचे योग्य नियोजन, बचत, गुंतवणूक संपत्तीचे नियोजन, कर नियोजन इत्यादीसाठी समाजात सीए यांचे मार्गदर्शन हे महत्वाचे असून भुसावळसारख्या शहरात विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांनी सीए अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावा आणि आयसीआय या संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या वाचनालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री संजय सावकारे यांनी येथे केले.
सीए अभ्यासिकेचे भुसावळात उद्घाटन
भुसावळातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन मंत्री सावकारे यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. भुसावळातील कला विज्ञान आणि पु.ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए, सीएस, सीएमए करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी सीए अभ्यासिका सुरू करण्यात आली असून याप्रसगी सीए अर्पित काबरा (सीसीएमआय, सीएआय, न्यू दिल्ली) यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा रंगला.



यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि माजी विद्यार्थी संघटनेचे सल्लागार डॉ.मोहन फालक होते. प्रमुख उपस्थितांमध्ये सीए हितेश आगीवाल (चेअरमन डब्ल्यू आय आर सी जळगाव), सीए मुकेश अग्रवाल (भुसावळ), ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय नाहाटा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, उपप्राचार्य डॉ.दीपक पाटील, उपप्राचार्य तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ.जी.आर.वाणी तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.वाय.एम.पाटील, पर्यवेक्षिका प्रा.स्वाती पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा.प्रशांत पाटील यांची उपस्थिती होती.
देशात सीएंची गरज वाढली
सीए अर्पित काबरा यांनी भारतात सीएचे महत्व हे वाढत असल्याचे सांगून उद्योगांच्या वाढत्या संख्येमुळे सीएची गरजही वाढत असल्याचे सांगिते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात आयसीआय ही संस्था भविष्यात अधिक संख्येत समाजात सीएची उपलब्धता करणार आहे. ही वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावा कारण भविष्यात भारतात सीएची मागणी ही वाढणारच आहे. यानंतर
सीए हितेश आगीवाल यांनी जळगाव जिल्ह्यात, भुसावळ शहरात सीएची संख्या ही वाढत आहे. विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्राधान्य देत आहे. या वाचनालयाद्वारे ज्या विद्यार्थ्यांना घरी अभ्यासाचे वातावरण उपलब्ध होत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक सोयीची बाब आहे. आयसीआय या संस्थेद्वारे आपल्या शहरात सीए करणार्या विद्यार्थ्यांसाठी वाचनालय उपलब्ध होत आहे.
सीए मुकेश अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांनी भारतात व्यवसायिकांची वाढती मागणी व महत्त्व गांभीर्याने लक्षात घ्यावे व आवश्यक परिश्रम करावे. वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती घ्यावी, असे आवाहन करीत जास्तीत जास्त-विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी. सीए करणार्या विद्यार्थ्यांसाठी माजी विद्यार्थी संघटना व आयसीएआय या संस्थेद्वारे विद्यार्थ्यांसाठी हे वाचनालय उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे सांगितले.
माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा.प्रशांत पाटील यांनी आपल्या मनोगतात माजी विद्यार्थी संघटना कोणकोणते कार्य करते आणि आजपर्यंत कोणकोणती विद्यार्थ्यांच्या हिताची कार्य केलेली आहे, आणि भविष्यात कोणती कार्य करण्याचा मानस आहे याविषयीची माहिती दिली.
अध्यक्ष डॉ.मोहन फालक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, माजी विद्यार्थ्यांचे नेहमीच सहकार्य महाविद्यालयास असते, माजी विद्यार्थ्यांचे कार्य हे कौतुकास्पद असून त्यांनी आपले कार्य असेच चालू ठेवावे त्यासाठी त्यांना आमच्या ताप्ती एज्युकेशन सोसायटीची काही मदत लागल्यास आम्ही आपणास नक्कीच देऊ.
19 पासून अभ्यासिका होणार खुली
येत्या 19 तारखेपासून ही अभ्यासिका सीए, सीएस, सीएमए च्या विद्यार्थ्यांसाठी खुली होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव उपप्राचार्य डॉ.जी.आर.वाणी यांनी तर सूत्रसंचालन माजी विद्यार्थी संघटनेचे सहसचिव डॉ.चंद्रकांत सरोदे यांनी आणि ऋणनिर्देशन उपप्राचार्य डॉ.दीपक पाटील यांनी मानले. माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष डॉ.आशिष चौधरी, कोषाध्यक्ष प्रा.हर्षल पाटील, डॉ.गौरी पाटील, प्रा.स्मिता बेंडाळे, प्रा.स्वाती शेळके, प्रा.डॉ.सचिन येवले, प्रा.कौस्तुभ पाटील, प्रा.भूपेंद्र बाणाईत, मुकेश फिरके, भगवान तायडे, सचिन पाटील तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.







