भुसावळातील भोळे महाविद्यालयाच्या बॉक्सिंग खेळाडूची विद्यापीठ संघात निवड


Boxing player from Bhole College, Bhusawal selected in the university team भुसावळ (6 मार्च 2026) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, आंतर विभागीय बॉक्सिंग पुरुष स्पर्धा एसपीडीएम महाविद्यालय, शिरपूर येथे झाल्या. या स्पर्धेत दादासो देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील तृतीय वर्षाचा बॉक्सिंग खेळाडू पवन संजय सावळे याने 47 ते 50 किलो गटात तसेच 65 ते 70 गटात गुलाम हुसेन खान चांद खान (तृतीय वर्ष विज्ञान), 70 ते 75 गटात प्रतीक दिनेश सुरवाडे (तृतीय वर्ष विज्ञान), 80 ते 85 किलो गटात गौरव गोपाळ बार्‍हे यांनी प्रथम क्रमांक पटकावत जळगाव विभागास जनरल चॅम्पियनशिप मिळवून दिली.

महाविद्यालयातर्फे खेळाडूंचा गौरव
या खेळाडूंची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धा, कुरुक्षेत्र विद्यापीठ कुरुक्षेत्र हरियाणासाठी निवड झाली. ही स्पर्धा 2 ते 7 मार्च 2026 दरम्यान होत आहे. या यशाबद्दल महाविद्यालयात माजी व्यवस्थापन परिषद व सिनेट सदस्य प्राचार्य डॉ.राजू फालक, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, प्रा.एस.डी.चौधरी व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वी खेळाडूंना प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी मार्गदर्शन केले.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !