भुसावळात शिवजयंती मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष


Chants of praise for Chhatrapati Shivaji Maharaj during the Shiv Jayanti procession in Bhusawal भुसावळ (7 मार्च 2026) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती शुक्रवार, 6 रोजी शहरात उत्साहात साजरी झाली. शहरात सात मिरवणुका व दोन दुचाकी रॅली निघाल्या. सायंकाळी सहानंतर मिरवणूक सुरू झाल्या असल्यातरी त्या रात्री दहा वाजता म्हणजे चार तासांत आटोपल्या. जय भवानी-जय शिवाजी या जयघोषामुळे शहर दुमदुमले होते.

शहरात निघाल्य दुचाकी रॅली
शहरातील रेल्वे स्टेशनमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे गुरुवारी रात्री 12 वाजता पूजन करून आरती झाली. पुतळ्याच्या परिसरात सुशोभिकरण केले होते. या ठिकाणी डीवायएसपी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात होता. बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून छत्रपती शिवाजी महाराज जयंती समितीतर्फे सकाळी 9 वाजता मोटारसायकल रॅली निघाली. नाहाटा महाविद्यालयाजवळून ही रॅली निघाली. अ‍ॅड.मिलिंद कापडे यांनी नेतृत्व केले. तिचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ समारोप झाला.



शहरातील विविध भागातून निघाल्या मिरवणुका
शहरातील यु.एम. ग्रुप उंट मोहल्ला येथून अ‍ॅड.मिलिंद कापडे, पाटील मळ्यातील युवा संकल्प प्रतिष्ठानतर्फे भरत रडे, स्वराज्य ग्रुपतर्फे प्रवीण देऊळकर, शनि मंदीर वॉर्ड मंडळातर्फे दीपक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक निघाली. न्यू सब्जी मंडळ न्यू एरिया वार्डातून मिरवणूक काढण्यात आली. पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त राखला.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !