भुसावळात दे.ना.भोळे महाविद्यालयात मलेरिया व एड्स जनजागृती व्याख्यान


Malaria and AIDS awareness lecture at De.N.Bhole College, Bhusawal भुसावळ (7 मार्च 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात मलेरिया व एड्स जनजागृती बाबत व्याख्यान झाले. यावेळी भुसावळ नगरपरिषद दवाखान्याचे पर्यवेक्षक राजेंद्र सुरवाडे, भानुदास चौधरी, प्रदीप झांबरे चंद्रकांत चौधरी यांनी माहिती दिली.

यांची विचार मंचावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.अंजली पाटील उपस्थित होते.



मलेरियाचा उद्रेक डासांमुळेच
चंद्रकांत चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, मलेरिया हा डासांमुळे पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. अनॉफिलीस मादी डास चावल्यामुळे हा रोग होतो. याची लक्षणे ताप, थंडी वाजणे, डोकेदुखी, अशक्तपणा असून बचावासाठी परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साचू न देणे, मच्छरदाणी व डास प्रतिबंधक वापरणे असल्याचे ते म्हणाले.

एड्सबद्दल सांगितले की, एड्स हा विषय जनजागृतीचा आहे. एड्स हा एचआयव्ही विषाणूमुळे होणारा गंभीर आजार आहे. हा रोग शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो. असुरक्षित लैंगिक संबंध, संक्रमित रक्त, सुई किंवा इंजेक्शन वापरल्याने तसेच आईकडून बाळाला एड्स होऊ शकतो. मात्र हस्तांदोलन, एकत्र जेवण, मिठी मारणे किंवा डास चावल्याने एड्स पसरत नाही. त्यामुळे एचआयव्ही बाधित व्यक्तींना दूर न ठेवता त्यांना सहकार्य आणि आधार देणे गरजेचे आहे. जागरूकता आणि सुरक्षित वर्तन हेच एड्सपासून संरक्षणाचे सर्वोत्तम साधन आहे.

उपक्रमासाठी प्रा.श्रेया चौधरी, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.सुशीला बाटे, प्रा.गायत्री नेमाडे, प्रा.अश्विनी भाग्यवंत, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.डॉ.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.अनिल सावळे, विजय पाटील, प्रकाश चौधरी, प्रकाश सावळे, सुधाकर चौधरी, सुनील ठोसर आदींनी परिश्रम घेतले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !