स्री शक्तीचा आदर करायला हवा : भुसावळात डॉ.पूजा गादिया
Women’s power should be respected: Dr. Pooja Gadiya in Bhusawal भुसावळ (7 मार्च 2026) : श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवसानिमित्त एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश जोशी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख वक्ता म्हणून डॉ.पूजा गादिया यांनी मार्गदर्शनात स्त्री शक्तीचा आदर करण्याचे आवाहन केले.
मान्यवरांचा सत्कार
प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी प्रमुख वक्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सर्व महिला प्राध्यापकांनीही पुष्पगुच्छ देऊन प्रमुख वक्त्यांचे स्वागत केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. डॉ. पूजा गादिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या दैनंदिन जीवनशैलीत शारीरिक मानसिक स्वास्थ जीवनशैली साठी आपल्या संतुलित आहारात विटामिन ए,बी,सी, डी चा समावेश करावा तसेच योगासन प्राणायाम मेडिटेशन करावे, शांत झोप घ्यावी असे आपले विचार व्यक्त केले.


सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर
प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वांनी आपल्या माता-पितांचा सन्मान करावा. आज महिलावर्ग सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत, सर्व क्षेत्रात सर्वात जास्त मेहनत महिला घेतात. सहनशीतलता महिलांमध्ये जास्त असते, समाजाने श्री शक्तीचा आदर केलाच पाहिजे. आई, बहिण, मुलगी या सर्व भूमिका त्या उत्कृष्टरित्या सांभाळतात. आईची माया प्रेम कोणी विसरू शकत नाही व सर्वांना समान अधिकार मिळालेच पाहिजे, असे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.ज्योती ओस्तवाल तर आभार प्रा.अनुपम शर्मा यांनी मानले. डॉ.सुधीर शर्मा, डॉ.विवेक जोशी, प्रा.शीबा खान, प्रा.समता तायडे, प्रा.कविता पांडव, प्रा.गणेश घोडेकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







