जोगलखेडे व भानखेडे शाळेत महिला दिनी माता पालकांचा सन्मान
Mothers and parents honored on Women’s Day at Jogalkhede and Bhankhede schools भुसावळ (8 मार्च 2026) : भुसावळ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या जोगलखेडे व भानखेडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या माता पालकांचा सन्मान शाळांमार्फत महिलादिनाचे औचित्य साधून करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच सारिका पंकज पाटील होत्या. व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्या शुभांगी पाटील, रेखा सोनवणे, जोगलखेडे मुख्याध्यापक जितेंद्र झांबरे आणि भानखेडे शाळेचे मुख्याध्यापक गणेश फेगडे उपस्थित होते.
उपशिक्षिका सोनाली तायडे यांनी जगभरातील कर्तृत्ववान महिलांविषयी माहिती सांगितली तसेच प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडी घेत असल्याने सर्वांनी विविध उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापकांनी सुद्धा महिला शिक्षण व जागृती विषयी सविस्तर माहिती सांगितली. सरपंच सारिका पाटील आणि सदस्यांच्या हस्ते उपस्थित माता पालकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपशिक्षक सुधीर तायडे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या माता पालक तसेच गावातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.









