अनिल अंबानींच्या अडचणी कायम : 1085 कोटींच्या फसवणूक प्रकरणी सीबीआयने दाखल केला गुन्हा


Anil Ambani’s problems continue: CBI files case in Rs 1085 crore fraud case मुंबई (8 मार्च 2026) : देशातील प्रख्यात उद्योगपती आणि रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्यासमोरील अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पंजाब नॅशनल बँकेची 1085 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या तत्कालीन अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नेमके प्रकरण काय?
पंजाब नॅशनल बँकेचे मुख्य व्यवस्थापक संतोषकृष्ण अण्णावरपू यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने ही एफआयआर नोंदवली आहे. तक्रारीनुसार, 2013 ते 2017 या कालावधीत अनिल अंबानी यांनी रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या अधिकार्‍यांशी संगनमत करून बँकेची मोठी फसवणूक केली.



बँकेच्या दाव्यानुसार नुकसानीचा तपशील
पंजाब नॅशनल बँक : 621.39 कोटी रुपये.
युनायटेड बँक ऑफ इंडिया: 463.80 कोटी रुपये (2020 मध्ये या बँकेचे पीएनबीमध्ये विलीनीकरण झाले आहे).

‘निधीचा गैरवापर आणि गुन्हेगारी कट’
बँकेने आपल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. रिलायन्स कम्युनिकेशन्सने कर्ज परत न करण्याच्या उद्देशानेच 1085 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा दावा बँकांनी केला आहे. तसेच, ज्या कारणासाठी कर्ज घेण्यात आले होते, त्याऐवजी हा निधी जाणीवपूर्वक इतरत्र वळवण्यात आला.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !