न.ह.रांका विद्यालयात क्रीडा विभागांतर्गत महिला दिन उत्साहात


बोदवड (9 मार्च 2026) : शहरातील न.ह. रांका विद्यालयात महिला दिनाचे औचित्य साधून मंजुलता सुराणा यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला.

यांची होती उपस्थिती
वैशाली जैन, सुजा कोटेचा, शिल्पा जैन, कांता जैन, अर्चना जैस्वाल, शोभा माटे, कांतादेवी रमेशजी जैन, प्राजक्ता प्रमोद पाटील, अनिता अरविंद चौधरी, विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एम.पाटील, उपमुख्याध्यापिका एम.एस.बडगुजर, उपप्राचार्य एम.टी.नेमाडे, पर्यवेक्षक आर.के.तायडे, जे.एन.माळी, क्रीडा विभाग प्रमुख डॉ.संजय निकम, एन.यु.बागुल, विद्यालयातील शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू भगिनी, विद्यार्थी-विद्यार्थिनी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक सूचना डॉ.संजय निकम यांनी तर अनुमोदन एन.यु.बागुल यांनी दिले.

मान्यवरांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर विद्यालयातील महिला शिक्षिकांचा सन्मान नगरसेविका सीमा प्रशांत नरवाडे यांच्याकडून देण्यात आलेल्या ट्रॉफी देऊन करण्यात आला.यानंतर 26 जानेवारी रोजी झालेल्या कलाविष्कार पारितोषिक वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन रूपाली भुसारी तर आभार जया मगरे यांनी मानले.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
एनसीसी विभाग प्रमुख एस.आर.सावळे, आर.एस.पी.प्रमुख रवींद्र उघडे, निता पाटील, स्काऊट गाईड व्ही.एस.काळबैले, जगदीश बडगुजर, जी.डी.चौधरी, व्ही.आर.पाटील, एस.पी.कोंगे, मनीषा मांडळकर तसेच लेझीम पथक एन.यु.बागुल, उच्च माध्यमिक लेझीम पथक जे.के.पाटील, नृत्य माध्यमिक मनीषा मांडळकर, अंकित बोरसे, वेरूळकर, जयस्वाल, उच्च माध्यमिक विभाग चोपडे, फाटे, मनोरे, भूषण भोई, महेंद्र पंडित, पी.बी.नरवाडे, एस.आर.पाटील, सचिन सत्रे, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !