इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीला रमा गर्ग यांची भेट
भुसावळ (11 मार्च 2026) : भुसावळातील इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीला ओसीव्ही अंतर्गत रमा गर्ग यांनी शुक्रवार, 7 मार्च रोजी भेट दिली. क्लबतर्फे त्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण व फुलांच्या पायघड्यांनी स्वागत करण्यात आले.
दौर्यादरम्यान क्लबच्या वर्षभरातील सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. क्लबच्या प्रेसिडेंट सीमा सोनार व पदाधिकार्यांनी केलेल्या कामाचे रमा गर्ग यांनी कौतुक केले.
यावेळी ई-लर्निंगसाठी स्व.सुशीलाबाई नामदेव फाळक विद्यालयाला 32 इंचांचा स्मार्ट टीव्ही देण्यात आला तसेच उज्ज्वला भामरे या गरजू महिलेला स्वावलंबनासाठी शिलाई मशीन प्रदान करण्यात आली. रमा गर्ग यांनी क्लबच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रसंगी क्लबचे सर्व बोर्ड ऑफ मेंबर व सदस्य हजर होते.



