भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये पदवी प्रदान समारंभ उत्साहात


भुसावळ (13 मार्च 2026) : शहरातील कोलते फाउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित द वर्ल्ड स्कूलमध्ये मंगळवार, 10 मार्च रोजी पदवीप्रधान समारंभ उत्साहात साजरा झाला. प्रमुख अतिथी डॉ.रेखा पाटील, निशिकांत कोलते, राजश्री कोलते, संचालक सी.ए. पवन कोलते, संचालक सी.ए. रोहित कोलते, मुख्याध्यापिका पेट्रिश्या ह्यॅसेट होत्या.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रि-प्रायमरी व इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर केले. वरिष्ठ केजी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. त्यांच्या नृत्याचे मान्यवर व पालकांनी कौतुक केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षिका, पर्यवेक्षिका, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !