यावल शहरातील नगरपरिषद शादी हॉल परिसरात पाईप लाईनच्या कामाला सुरूवात


Pipeline work has commenced in the vicinity of the Municipal Council Wedding Hall in Yawal city. यावल (14 मार्च 2026) : यावल शहरातील चोपडा रस्त्यावर राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सबस्टेशन समोरील शादी हॉल परिसरात नगर परिषदेकडून पाईप लाईन टाकण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. . या भागात नगरपरिषदेकडून सक्षम पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार होती. आता येथे काम सुरू झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

नगराध्यक्षांकडून शहरात विकासकामांना सुरुवात
यावल नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष छाया अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामांना सुरुवात झाली आहे. शहरातील चोपडा रस्त्यावरील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सबस्टेशन समोरील शादी हॉल परिसरात नगरपरिषदेकडून पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नव्हता तर काही भागात पाईप लाईनच नव्हती.





या भागातील नगरसेवक रूबीनाबी उमर कच्छी, उमर कच्छी, करीम मन्यार यांच्या कडे नागरीकांनी तक्रारी केल्या होत्या व नगरसेवक यांनी नगरपरिषदेकडे पाठपुरावा केला आणी आता या भागात पाईप लाईन टाकण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. या भागात कामाला सुरुवात झाल्यानंतर नगरसेवकांनी या भागातील कामाची स्वतः पाहणी केली. लवकरचं कामे पूर्ण होत या भागातील पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यापुर्वीच सुटत असल्याने नागरीकांमधुन समाधान व्यक्त होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !