भुसावळ शहरात 29 मार्चला बहुभाषिक कवी संमेलन

प्रतिष्ठा महिला मंडळाचा उपक्रम : विभागातील कवींचा सहभाग


Multilingual Poets’ Conference in Bhusawal City on March 29. भुसावळ (26 मार्च 2026) : शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे रविवार, 29 रोजी सायंकाळी सहा वाजता बहुभाषिक कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे असतील. या बहुभाषिक कवी संमेलनात भुसावळसह विभागातील नामांकीत कवींचा सहभाग असणार आहे.

यांची असेल प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमास उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे, प्रा.डॉ.रश्मी शर्मा, ज्येष्ठ साहित्यिक व बहिणाबाई साहित्य परिषद डोंबिवलीचे अध्यक्ष प्रा.किसन वराडे, भुसावळच्या ज्येष्ठ साहित्यीक डॉ.सुषमा खानापूरकर,
खान्देश साहित्य संघ शाखा जळगाव अध्यक्ष प्रा.संध्या महाजन, खान्देश साहित्य संघ भुसावळ अध्यक्ष जयश्री काळवीट प्रमुख उपस्थिती असणार आहे. स्वागताध्यक्षा रजनी सावकारे असतील.


या कवींचा संमेलनात सहभाग
या कवी संमेलनात कवयित्री प्रा.संध्या महाजन, कवयित्री ललिता टोके (भुसावळ), कवयित्री ज्योती वाघ (जळगाव), कवी घनशाम सावरकर (वरणगाव), कवयित्री जयश्री काळवीट (भुसावळ), कवयित्री सुनीता येवले (जळगाव), कवी श्रीकांत जोशी (भुसावळ), कवयित्री ज्योती राणे (जळगाव), कवी प्रकाश पाटील (जळगाव), कवयित्री लीना अहिरे (भुसावळ), कवी हारून उस्मानी (भुसावळ), 12) डॉ.मिलिंद धांडे (भुसावळ), कवयित्री नीलिमा नेहेते (नाशिक), कवी राजेंद्र जावळे (भुसावळ), कवयित्री संध्या भोळे (भुसावळ), कवयित्री सीमा भारंबे (भुसावळ) आदींचा सहभागी होणार असून आपापल्या साहित्यासह कवितांचे सादरीकरण करणार आहेत. कवी संमेलनाचा भुसावळ शहरवासीयांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी केले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !