डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रामजन्मोत्सव साजरा


Ram Janmotsav Celebrated at Dr. Ulhas Patil Medical College जळगाव (26 मार्च 2026) : डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अन्नपुर्णालयम येरथे रामनवमीनिमित्त रामजन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते प्रभू रामचंद्र यांची पूजा करण्यात आली. राजपुरोहीत डी.टी. राव यांनी मंत्रपठण केले. यावेळी श्रीरामाची महाआरती होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डॉ. माया आर्विकर, डॉ. विजय बाविस्कर, पियुष भंगाळे यांच्यासह अन्नपुर्णालयमचे कर्मचारी उपस्थित होते. दिवसभर प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी अन्नपुर्णालयम येथे भाविकांनी गर्दी केली होती. याप्रसंगी गीत रामायणावर आधारीत भजनसंध्या सादर करण्यात आली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !