प्रवाशांनो लक्ष द्या : गोंदिया स्थानकावर ट्रॅक कामामुळे ब्लॉक ! चार रेल्वे गाड्या रद्द
Attention Passengers : Block at Gondia Station Due to Track Work! Four Trains Cancelled. भुसावळ (27 मार्च 2026) : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्गत दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत गोंदिया स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर वॉशेबल एप्रन काढून त्याऐवजी बॅलेस्टेड ट्रॅक टाकण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याने चार रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
गाडी क्रमांक 18030 शालिमार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 4 ते 24 दरम्यान रद्द राहील.

गाडी क्रमांक 18029 लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार एक्सप्रेस 6 ते 26 दरम्यान रद्द राहील.
गाडी क्रमांक 12101 लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार एक्सप्रेस 4 ते 21 एप्रिल दरम्यान रद्द राहील.
गाडी क्रमांक 12102 शालिमार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 6 ते 23 एप्रिलदरम्यान रद्द असेल.
प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना वरील बदल लक्षात घ्यावेत तसेच गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेची अधिकृत वेबसाईट तसेच अॅप किंवा जवळच्या स्थानकावरून अद्ययावत माहिती घ्यावी.
रेल्वे प्रशासन प्रवाशांना होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.




