भुसावळात इनरव्हीलतर्फे दंत तपासणी शिबिर


Dental Check-up Camp Organized by Inner Wheel in Bhusawal भुसावळ (27 मार्च 2026) : शहरातील इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीच्या वतीने भगीरथी प्राथमिक विद्यालयात दंत तपासणी शिबिरासह जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रकल्पांतर्गत दंत शल्यचिकित्सक डॉ.मकरंद चांदवडकर यांनी विद्यार्थ्यांची दंत तपासणी करून त्यांना दातांची काळजी व तोंडाच्या स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले.

यांची होती उपस्थिती
या उपक्रमाचा लाभ इयत्ता 1 ली ते 4 थी मधील सुमारे 90 विद्यार्थ्यांनी घेतला. विद्यार्थ्यांना याप्रसंगी महेश सोनार यांच्यातर्फे मोफत टूथ ब्रश व पेस्टचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य अजय फेगडे तसेच शिक्षिका भावना पाटील, सविता वानखेडे आणि ज्योती हिरे उपस्थित होत्या. यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सीमा सोनार, सचिव योगिता यवकोले तसेच क्लब सदस्य अनीता महाजन, जयश्री चौधरी आणि अदिती भडांग यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !