भुसावळ रेलसिटी इनरव्हील क्लबतर्फे ‘सेफ-अनसेफ स्पर्श’ जनजागृती उपक्रम


भुसावळ (28 मार्च 2026) : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी यांच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षितता व जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘सेफ-अनसेफ स्पर्श’ या विषयावर जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम भागीरथी प्राथमिक विद्यालय व सोनिच्छा ड्रॉईंग क्लासेस, भुसावळ येथे पार पडला.

या कार्यक्रमाचे मार्गदर्शन सोनिच्छा ड्रोइंग क्लासेसच्या संचालिका जयश्री चौधरी यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित व असुरक्षित स्पर्श यातील फरक सोप्या भाषेत समजावून सांगत स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले.


या उपक्रमास सुमारे 100 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. यशस्वीतेसाठी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सीमा सोनार, सचिव योगीता वाकोले तसेच क्लब सदस्य अनिता महाजन, अदिती भडांग यांनी विशेष परिश्रम घेतले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !