नाटकात नवनवीन प्रयोग होणे आवश्यक : रंगकर्मी रमाकांत भालेराव
रंगभूमी दिन उत्साहात साजरा
भुसावळ (28 मार्च 2026) : शहरातील स्नेहयात्री प्रतिष्ठानतर्फे आयोजित जागतिक रंगभूमी दिनानिमित्त शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात सायंकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी रमाकांत भालेराव यांच्याहस्ते नटराज प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नटराज पूजन करण्यात आले. नंतर उपस्थित सर्व रंगकामींनी नटराज पूजन केले. यावेळी बोलताना रमाकांत भालेराव यांनी नाटकामध्ये वेगवेगळे प्रयोग होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी नारायण माळी, धनराज कुंवर, विरेंद्र पाटील, कुणाल बाविस्कर, हर्ष बाविस्कर, अवधूत दामोदरे ज्योती शितोळे, मंगेश भावे, विराज गोरे, समीर पाटील यांसह अनेक रसिक उपस्थित होते. सूत्रसंचालन नारायण माळी यांनी केले.





