भुसावळातील जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांना कायदे व आरोग्य विषयक मार्गदर्शन
किमया बहुउद्देशीय संस्था व तालुका विधीसेवा समितीचा उपक्रम
Legal and Health Guidance for Students at Jawahar Navodaya Vidyalaya, Bhusawal भुसावळ (29 मार्च 2026) : साकेगावातील जवाहर नवोदय विद्यालयात तालुका विधी सेवा समिती व किमया बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, 28 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजता कायदे व आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिर झाले.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी नवोदय विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र खंडारे होते. यावेळी शिक्षक व शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. शिबिरात किमया बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा अॅडव्होकेट जास्वंदी भंडारी व रिटेनर अॅड.अभिजीत मेने, स्त्री रोग तज्ञ डॉ.सुवर्णा गाडेकर, पत्रकार उज्वला बागुल यांनी मार्गदर्शन केले.

मान्यवरांनी केले मार्गदर्शन
अॅड.जास्वंदी भंडारी यांनी पॉेसो कायद्याविषयी विस्तृत माहिती देताना सांगितले की, हा कायदा भारतातील मुलांच्या (18 वर्षांखालील) लैंगिक अत्याचारांपासून मुलांचे संरक्षणासाठी बनवलेला महत्त्वाचा कायदा आहे. मुलांवर होणार्या लैंगिक गुन्ह्यांना रोखणे,व पीडित मुलांना न्याय आणि संरक्षण देणे हा मुख्य उद्देश आह. जर, 18 वर्षांखालील कोणतेही मुलगा किंवा मुलगी यांना लैंगिक छळ, लैंगिक अत्याचा , वारंवार त्रास देणे, धमकी देणे आदी कोणी करीत असले तर त्याची त्वरीत तक्रार करा, असे आवाहन त्यांनी केले.
समाजात गुन्हे होऊ नये यासाठी कायदे असतात न्यायव्यवस्था आहे सर्वांनी दक्षता घ्या, अन्याय वअत्याचार होऊ नये यासाठी सदैव सजग रहा असा मौलिक सल्ला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य राजेंद्र खंडारे यांनी यावेळी दिला.
अॅड.अभिजित मेने यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण हा भारतातील लोकांना मोफत कायदेशीर मदत देण्यासाठी तयार केलेला संस्थात्मक ढाचा असल्याचे सांगिले.
डॉ.सुवर्णा गाडेकर यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या व कुटुंबाच्या स्वप्नपूर्ती करण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी हेतू साध्य करण्यासाठी शारीरिक आरोग्या सोबतच मानसिक आरोग्यसुद्धा कसे चांगले असले पाहिजे याचे महत्व विविध उदाहरणे देऊन पटवून सांगितले की, उत्तम आरोग्य हे जीवनाचे खरे धन आहे. उत्कृष्ट आणि संतुलित आहारामुळे शरीर निरोगी राहते.
कार्यक्रमाचे आयोजन विधी सेवा समितीच्या समांतर विधी सहाय्यक पत्रकार उज्वला बागुल यांनी केले. यावेळी त्यांनी विधी सेवा समितीच्या कार्याचे महत्त्व विषद केले. समिती गरजू व वंचित घटकांना मोफत कायदेशीर मदत पुरवते. लोकअदालतीचे आयोजन, कायदेविषयक जनजागृती, समुपदेशन व मध्यस्थी, विशेष घटकांना सहाय्य, कैद्यांना कायदेशीर मदत आदी उपक्रमांद्वारे सर्वांसाठी न्याय सुनिश्चित करण्याचे कार्य समिती करत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. सूत्रसंचलन प्रा.सराटे यांनी केले. यशस्वीतेसाठी जवाहर नवोदय विद्यालय विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांसह आयोजकांनी परिश्रम घेतले.




