भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात स्व.दादासाहेब एन.के.नारखेडे यांना अभिवादन


Tribute paid to the late Dadasaheb N.K. Narkhede at K. Narkhede School in Bhusawal. भुसावळ (29 मार्च 2026) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात रविवारी सकाळी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ भुसावळ तसेच के. नारखेडे कॉम्प्युटर टेक्नोलॉजी संस्थेचे माजी अध्यक्ष कै.दादासाहेब एन. के.नारखेडे यांना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच शंभराव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी संस्थेचे ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे यांच्याहस्ते स्वर्गीय दादासाहेब एन.के.नारखेडे यांच्या प्रतिमेस मार्ल्यापण व अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अ‍ॅड.संगीता अडकमोल, संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील, पर्यवेक्षक एस.पी.पाठक, पर्यवेक्षक सुनील राणे व उपस्थित संगणक विभागासहित विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर उपस्थित होते.


याप्रसंगी के.नारखेडे कॉम्प्युटर संस्थेतही स्वर्गीय दादासाहेब एन. के. नारखेडे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे, उपाध्यक्ष डॉ.किशोर नारखेडे, शालेय समिती चेअरमन श्रीनिवास नारखेडे, डॉ.संजीव नारखेडे, भाग्येश नारखेडे, राज नारखेडे आदींनी दादासाहेब एन. के. नारखेडे यांना विनम्र अभिवादन केले. विद्यालयातील उपशिक्षक मनोज कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !