डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा : इराणने कच्च्या तेलाची 20 जहाजे पाठवली


Donald Trump Claims: Iran Sent 20 Crude Oil Tankers नवी दिल्ली (30 मार्च 2026) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा करीत इराणने ‘सन्मानाचे प्रतीक’ म्हणून अमेरिकेला कच्च्या तेलाने भरलेली 20 मोठी जहाजे पाठवल्याचे म्हटले आहे. होर्मुजची सामुद्रधुनी सध्या इराणच्या नियंत्रणाखाली आहे. तेथे केवळ मित्र राष्ट्रांच्या जहाजांनाच सूट देण्यात आली असतानाच, ट्रम्प यांनी केलेल्या या दाव्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

20 तेलवाहू जहाजे पाठवली
आपले खासगी विमान ’एअर फोर्स वन’वरून पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले, इराणने सन्मान दाखवत अमेरिकेसाठी 20 मोठी तेलवाहू जहाजे पाठवली आहेत. ही प्रक्रिया उद्या सकाळपासून सुरू होईल आणि पुढील काही दिवस चालेल. सुरुवातीला ते केवळ 10 जहाजे पाठवण्यास तयार होते, मात्र आता त्यांनी ही संख्या 20 पर्यंत वाढवली आहे. तसेच, इराण आता करारासाठी आणि तडजोडीसाठी तयार असल्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !