रेल्वे प्रवाशांना दिलासा : शालिमार व ज्ञानेश्वरी एक्सप्रेसची सेवा पुन्हा सुरू
या गाड्या नियमित धावणार
गाडी क्रमांक 18030 शालिमार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 4 एप्रिल ते 24 एप्रिल 2026 या कालावधीत रद्द गाडी शालिमार येथून नियोजित वेळेनुसार धावेल.

गाडी क्रमांक 18029 लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार एक्सप्रेस 6 एप्रिल ते 26 एप्रिल 2026 या कालावधीत रद्द करण्यात गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून नियोजित वेळेनुसार धावणार आहे.
गाडी क्रमांक 12101 लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार ज्ञानेश्वरी सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी 4, 5, 7, 8, 11, 12, 14, 15, 18, 19, 21 व 22 एप्रिल 2026 या कालावधीत रद्द केलेली गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून नियोजित वेळेनुसार धावणार आहे.
गाडी क्रमांक 12102 शालिमार-लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी 6, 7, 9, 10, 13, 14, 16, 17, 20, 21, 23 व 24 एप्रिल 2026 या कालावधीत रद्द केलेली गाडी शालीमार येथून नियोजित वेळेनुसार धावेल.
प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी तसेच प्रवाशांनी गाड्यांची अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत चौकशी क्रमांक 139, ‘रेलवन’ किंवा रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाचा उपयोग करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.




