भुसावळात स्व.दादासाहेब एन.के.नारखेडे ट्रॉफीसाठी उद्या फायनल मॅच


भुसावळ (30 मार्च 2026) : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे आधारस्तंभ माजी अध्यक्ष स्व.दादासाहेब एन.के. नारखेडे यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरात 14 वर्षाखालील मुलांसाठी आंतरशालेय लेदर बॉल क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आलेले आहे. रेल्वेच्या क्रीडांगणावर शनिवार, 28 मार्चपासून सुरू असलेल्या या टुर्नामेंटमध्ये अंतिम सामना मंगळवार, 31 रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे. ताप्ती पब्लिक स्कूल सेंट अलॉयसीस स्कूल, भुसावळच्या संघात होणार्‍या सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

स्पर्धेमुळे वाढली चुरस
के.नारखेडे विद्यालय भुसावळ, एन.के.नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ, ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ, ओसामा उर्दू हायस्कूल भुसावळ, सेंट अ‍ॅलॉयसीस, हायस्कूल भुसावळ व जी.एस.चौधरी हायस्कूल, वरणगाव या सहा संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदवल्यानंतर आता मंगळवारी होणार्‍या अंतीम सामन्याच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.


मुंबई क्रिकेट असोसिएशनचे लेवल कोच प्रतीक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या टुर्नामेंटसाठी पंच म्हणून वरळी स्पोर्ट क्लबचे अभिषेक धुळम व अपूर्व कानेरकर काम पाहत आहे. लेदर बॉल टुर्नामेंटची संकल्पना श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ भुसावळचे अध्यक्ष डॉ.मकरंद एन.नारखेडे व संस्था सदस्य भाग्येश नारखेडे यांची आहे. यशस्वीतेसाठी सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, ऑनररी जॉइंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्था सदस्य विकास पाचपांडे, मुख्याध्यापिका अ‍ॅड.संगीता अडकमोल मार्गदर्शन करीत आहे.

स्पर्धा समन्वयक म्हणून मनोज तडवी आहेत. यशस्वीतेसाठी के. नारखेडे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक पी.आर.सपकाळे, एन.पी.नेहेते, एन.ए.नेमाडे, के.एम.पारधी यांच्यासह व्ही.जी.सोनवणे, एस.पी.महाजन, एस.पी.झांबरे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे. स्पर्धांचे समालोचन ए.एम.जटाळे व एस.टी.चौधरी हे करीत आहे.

रविवारी के. नारखेडे विद्यालय व ताप्ती पब्लिक स्कूल यांच्यात झालेल्या उपांत्य सामन्यात ताप्ती संघाचा सम्मेद निलेश नीरखे याने नाबाद 52 रन करत आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवली तर जी. एस. हायस्कूल वरणगाव व सेंट अ‍ॅलॉयसीस हायस्कूल, भुसावळ यांच्यातील दुसर्‍या उपांत्य सामन्यात सेंट अ‍ॅलॉयसीस संघाचा गोलंदाज छायेश रवींद्र जाधव याने विरोधी संघाच्या सहा फलंदाजांना बाद केले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !