भुसावळात तीन तरुण वकिलांचा प्रेरणादायी सत्कार


भुसावळ (31 मार्च 2026) : भुसावळ शहरातील गौतम नगर व पंचशील नगर परिसरातील कष्टकरी कुटुंबांमधून अत्यंत प्रतिकूल सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक परिस्थितीवर मात करून वकिलीचे शिक्षण पूर्ण केलेल्या तीन तरुणांचा प्रेरणादायी सत्कार समारंभ नुकताच शहरात झाला. या कार्यक्रमात या या तरुणांचा आणि त्यांच्या परिवाराचा देखील सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमातून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत तरुणांनी गुन्हेगारी प्रवृत्तींपासून दूर राहून शिक्षणाच्या माध्यमातून जीवन घडवावे, असा संदेश देण्यात आला.

या तरुण वकिलांचा सत्कार
या समारंभात अ‍ॅड.शुभम चंद्रकांत सपकाळे, अ‍ॅड.भूषण दिगंबर गवळी, अ‍ॅड.आकाश रमेश सावळे या तीन तरुणांचा वकिली पदवी संपादन करण्यासाठी तसेच मुंबई विद्यापीठातून पदवीत्तर शिक्षणासाठी अमोल अनिल सुरवाकर या तरुणाचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारात बुके सोबत वकिली कोट आणि वकिली बॅन देण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.जयवंत मगर (सिनेट सदस्य, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व अध्यक्ष – मागासवर्गीय प्राध्यापक संघटना) होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. संजीव सावळे (उपप्राचार्य, जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर) यांनी मार्गदर्शन केले. तर प्रा. डॉ. अनिल हिवाळे (सचिव, मागासवर्गीय प्राध्यापक संघटना) यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांनी शिक्षणामुळे समाजात सकारात्मक बदल घडू शकतो, असे सांगत कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर मोठी यशस्वी वाटचाल करू शकते, असा विश्वास व्यक्त केला. त्या साठी शहरातील तरुणांनी कॉपी / नक्कल करू देऊन पदव्या वाटणार्‍या महाविद्यालय आणि शाळांपासून दूर राहावे. प्रामाणिकपणे घेतलेल्या शिक्षणामुळेच सर्व समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते, असे सांगितले. तसेच तरुणांनी गुन्हेगारी प्रवृत्तींपासून दूर राहून शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले. या चार तरुणांचा सत्कार इतर तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाला अ‍ॅड.सुनील पगारे, अ‍ॅड.संजय चौधरी, अ‍ॅड.प्रफुल्ल पाटील, अ‍ॅड.धीरज शंकपाल, अ‍ॅड.विजय तायडे, अ‍ॅड.संजय तेलगोटे, अ‍ॅड.सागर महाजन, अ‍ॅड.जय झोरे, प्रा.मुकेश पवार, भगवान तायडे, प्रा.जितेंद्र पाटील, आनंद सपकाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वकिली पेशा आणि संधी यावर शहरातील उपस्थित वकील बांधवांनी या तरुणांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा.डॉ. अनिल हिवाळे विद्यार्थी परिवार यांच्या वतीने करण्यात आले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !